
विजेत्या संघातील खेळाडूं सोबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळक, शिवाजीराव घोरपडे , प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य जगताप एन. एम., उपप्राचार्य सोमनाथ माने , संजय फडतरे, महादेव माने, सचिन धुमाळ, अमित काळे व अमोल नाळे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.१५ फेब्रुवारी २०२५):-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभाग स्तरीय शालेय फुटसाल स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने विजय संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.
या संघाचा सत्कार महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी फ. ए.सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन मा. श्री शिवाजीराव घोरपडे , फलटण एजुकेशन सोसायटी हायस्कूलचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे, उपप्राचार्य श्री जगताप एन. एम., ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , क्रीडा समिती सदस्य श्री संजय फडतरे, श्री महादेव माने, तसेच क्रीडा विभाग प्रमुख सचिन धुमाळ तसेच फुटबॉल प्रशिक्षक अमित काळे व अमोल नाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
फुटसाल या स्पर्धा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये उपांत्य सामन्यांमध्ये इचलकरंजी म.न.पा संघाचा 3-0 गोलने पराभव करून स्पर्धेचे अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा सांगली म.न.पा या संघाविरुद्ध झाला. या सामन्यांमध्ये ओम शिंदे व अभिषेक फडतरे या दोन खेळाडूंनी उत्कृष्ट गोल नोंदवून हा सामना देखील 2-0 गोलने जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
यास्पर्धेतील यशस्वी खेळाडूंन चे व फुटबॉल प्रशिक्षक श्री संजय फडतरे, श्री अमित काळे व श्री अमोल नाळे ,संकेत मठपती यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण -कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,फलटण एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सर्व पदाधिकारी,फलटण एजुकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम , तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा व फुटबॉलचे माजी खेळाडू ,क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.
