
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १६):-
फरांदवाडी कृषी क्रांती ऍग्रो प्रोडूसर कंपनी व आयोध्या फुड्स कंपनी फलटण यांचे संयुक्त विद्यमाने फरांदवाडी येथे धान्य ग्रेडिंग युनिट व गहू पीठ (आटा) केंद्राचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे अवाहन जेष्ठ पत्रकार व कृषी क्रांती कंपनीचे चेअरमन सुभाष भांबुरे यांनी केले आहे
धान्य प्रतवारी केंद्रा मार्फत शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे धान्य ग्रेडिंग 90/- रुपये प्रति क्विंटल व 160/- रुपये घरपोच सेवा देण्यात येणार आहे तसेच गहूपीठ एक किलो दोन किलो,व पाच किलो मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे तरी या दोन्ही केंद्रांचा लाभ शेतकरी व ग्राहकांनी घ्यावा.
यावेळी कृषी क्रांती कंपनीची संस्थापक दत्तात्रय राऊत मार्गदर्शक राजेंद्र राऊत संचालक अश्विनी राऊत आर्थिक सल्लागार बाळासो राऊत अरुण राऊत,दिलीप दळवे तसेच आयोध्या फुड्स कंपनी फलटणचे प्रो. प्रा.मृणाल पोरे
प्रियांका पोरे
किरण पोरे
धनश्री पोरे
तेजस पोरे उपस्थित होते.
