
प्राध्यापिका स्नेहा गवळी
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १६):-
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापिका स्नेहा गवळी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक या पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय स्तरावर त्यांचे अभिनंदन होत आहे.
स्नेहा गवळी यांनी अत्यंत मेहनत, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर ही प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली आहे. महसूल विभागातील एक महत्त्वाची जबाबदारी असलेल्या या पदावर निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या प्राध्यापकवर्गासह विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्नेहा गवळी यांच्या या यशाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले असून, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नवीन दिशादर्शक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी महाविद्यालयाच्या वतीने त्यांना शुभेच्छा!
