
(संग्रहित छायाचित्र मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि. कॉलेज फलटण)
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १९):-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागा तर्फे आयोजित केलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च २०२५ची मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि. कॉलेज फलटण केंद्र क्र. १००३ येथे दि. २१/०२/२०२५ ते १७/०३/२०२५ या कालावधी परीक्षा होणार असुन परीक्षा क्रमांक F025558 ते F025955 या क्रमांकांची बैठक व्यवस्था केली आहे. (एकूण विद्यार्थी ३९८ ). तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी. अशी माहिती केंद्रसंचालक श्री. मनोज अशोकराव कदम यांनी दिली.
विद्यार्थ्याने वरील केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रका प्रमाणे प्रवेश पत्रिका (रिसीट), ओळख पत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळे पूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमणध्वनी, मोबाईल, टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट,
कॅल्क्युलेटर वां तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने, उपकरण परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपी मुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पारपाडण्यासाठी
विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केंद्रसंचालक श्री. मनोज अशोकराव कदम, उपकेंद्रसंचालक श्री. विजयकुमार हरीभाऊ लोंढे पाटील, श्री. राकेश बापूराव नलवडे, श्री. उत्तम जगन्नाथ घोरपडे , मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य श्री. वेदपाठक संजय रामकृष्ण तसेच मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनि. कॉलेजचे उपप्राचार्य श्री. काळे बाळकृष्ण दादा, फलटण यांनी केलेले आहे.
