
छत्रपती शिवाजी महाराजयांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य वसंतराव शेडगे ,उपप्राचार्य नितीन जगताप,ज्युनियर चे उपप्राचार्य सोमनाथ माने , पर्यवेक्षिक पूजा पाटील व इतर मान्यवर शिक्षक मंडळी

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.२०):-
१९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस(जयंती) साजरा करण्यात येतो याचे औचित्य साधून फलटण एजुकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.वसंतराव शेडगे सर होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस मुख्यध्यापकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थीनींनी व सौ वनिता लोणकर मॅडम यांनी महाराष्ट्र गीत सादर केले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा आपल्या प्रभावी भाषणांतून करून दिला .
यावेळी मुख्याध्यापक श्री वसंतराव शेडगे सरांनी शिवाजी महाराजांबद्दल आपले विचार मांडताना सांगितले की जिजाऊं माँ साहेबांनी शिवरायांच्या बालमनावर कसे संस्कार केले व स्वराज्य निर्माण करण्यासाठी कसे प्रेरित केले त्याचा इतिहास व शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य स्थापनेचे ध्येय पूर्ण करून दाखवले तसेच आपणही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. असे आपल्या भाषणात सांगितले .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कु.तृप्ती शिंदे मॅडम ,सौ सोहनी सस्ते मॅडम, संतोष तोडकर सर , अमोल रणवारे सर यांनी आपले विचार मांडले. यावेळी माध्यमिकचे उपप्राचार्य नितीन जगताप सर, उच्च माध्यमिक चे उपप्राचार्य सोमनाथ माने सर, पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील मॅडम, किमान कौशल्याचे राजेंद्र रणसिंग सर ,संतोष तोडकर सर ,अमोल सपाटे सर, राजाभाऊ गोडसे सर,प्रीतम लोंढे सर,अनिल यादव सर,अनिल शेंडे सर ,शिवाजी सावंत सर ,अमोल रणवरे सर ,शंकर तडवी सर ,चेतन बोबडे सर ,निंबाळकर सर ,नार्वेकर सर ,देशपांडे सर,घाटे सर ,कु सोहनी सस्ते मॅडम ,कु तृप्ती शिंदे मॅडम ,वनिता लोणकर मॅडम तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी संतोष तोडकर सरांनी केले तर आभार उपप्राचार्य नितीन जगताप सरांनी मानले.
