
फलटण टुडे वृत्तसेवा :-
फलटण शहर पोलीस ठाणे येथे विविध गुन्ह्यातील अनेक वाहने जप्त करण्यात आली आहे. सदर वाहनांची निर्गती मोहीम फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन घेण्यात आली आहे. या अनुषंगाने खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
(१) ज्या वाहन मालकांची किंवा चालकांची वाहने फलटण शहर पोलीस ठाण्यास जप्त आहेत, त्यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे त्यांच्याकडील उपलब्ध कागदपत्रांसह येत्या १० दिवसांत संपर्क साधावा.
(२) तसेच सातारा जिल्ह्यातील भंगार व्यवसाय करणारे सर्व नोंदणीकृत व्यावसायीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचे नाव व परवाना क्रमांकसहीत फलटण शहर पोलीस ठाणे येथे त्यांच्याकडील उपलब्ध कागदपत्रांसह संपर्क साधावा.
(३) संपर्क दुरध्वनी क्रमांक (१) श्री हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, मोबाईल क्रमांक ७७५७८२७७४४ (२) श्री दिपक साळुंखे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, मोबाईल क्रमांक ९८५०५४३५२७
