
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २०):- येथील बारामती तालुका मराठा सेवा संघ आणि जिजाऊ सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला आणि माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी जिजाऊ सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे,जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण,बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे,बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे,एमआयडीसी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्यासह शिवभक्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती उत्सव कार्यक्रमां मध्ये लहान मुलां- मुलींनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरील आपले विचार व्यक्त केले,रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य सूर्यकांत भालेराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध गुणवैशिष्ठ्यां बाबतची माहिती विशद केली व जिजाऊ सेवा संघाच्या महिलांनी पाळणा सादर केला
या शिवजयंती उत्सव कार्य क्रमांच्या प्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी,माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते,शिवप्रेमी महिला,नागरिक व मुलं-मुली आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
