जैन सोशल ग्रुप,संगिनी फोरम ,युवा फोरम याचां अवॉर्ड कार्यक्रमात डंका!

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.२४):-

फलटण-महाबळेश्वर येथे जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझन चा कॉन्फरन्स व अवॉर्ड सेरेमनी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमा साठी संपूर्ण महाराष्ट्रातून बहु संख्येने प्रतिनिधी हजर होते.
या कार्यक्रमात जैन सोशल ग्रुप फलटण, संगिनी फोरम,फलटण व युवा फोरम, फलटण या तिन्ही ग्रुपचा बहुमान करण्यात आला. जैन सोशल ग्रुप अध्यक्षां
सौ.सविता दोशी यांना बेस्ट प्रेसिडेंट तसेच संगिनी फोरम अध्यक्षां सौ.अपर्णा जैन यांना बेस्ट प्रेसिडेंट व युवा फोरम सचिव श्री.पुनीत दोशी यांना बेस्ट सचिव अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
सन २०२३ते २०२५ या दोन वर्षाच्या कार्यकाळात जैन सोशल ग्रुप अंतर्गत तिनी ग्रुपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझन कडून
अवॉर्ड सेरेमनी कार्यक्रमात जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन चे निर्वाचित अध्यक्ष मा.श्री. बिरेनभई शहा, महाराष्ट्र रिजन अध्यक्ष मा. श्री.उन्मेशभई करनावट, अवार्ड कमिटी कन्व्हेनर मा.सौ.प्रीतीभाभी करनावट व मा.श्री.प्रीतेश तातेड , इंटरनॅशनल डायरेक्टर मा.श्री.महाविरजी पारेख,सोलापुर झोन कॉर्डिनेटर मा.श्री.सुनिल लोढा, कोल्हापूर झोन कॉर्डिनेटर मा.सौ. रज्जूबेन कटारिया यांचे शुभहस्ते महाबळेश्वर येथे शानदार समारंभात अवॉर्ड प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात श्री शरद भाई शहा स्मृति अभियान कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबद्दल जैन सोशल ग्रुप,फलटण यानां रत्न स्तंभ व संगिनी फोरम फलटण यांना सुवर्ण स्तंभ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तिनी ग्रुपच्या उज्वल यशा बद्दल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा.श्री. मंगेश दोशी, श्रीराम बझार चे संचालक मा.श्री.तुषार गांधी, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष मा.श्री.श्रीपाल जैन,सचिव मा.श्री.प्रीतम शहा, खजिनदार मा.श्री.समीर शहा,माजी अध्यक्ष मा.श्री. राजेंद्र कोठारी,डॉ. मिलिंद दोशी, संगिनी फोरम संस्थापक अध्यक्षां मा.सौ. स्मिता शहा, माजी अध्यक्षां मा.सौ.नीना कोठारी, संगिनी फोरम सचिव मा‌.सौ. प्रज्ञा दोशी,खजिनदार मा.सौ. मनीषा घडिया ,युवा फोरम अध्यक्ष मा.श्री.तेजस शहा,खजिनदार मा.श्री.मिहीर गांधी व तिनी ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले.
जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझन सर्व पदाधिकारी व सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे यश मिळवू शकलो असे तिन्ही पुरस्कार वीजेते यांनि नमुद केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!