
यशस्वी खेळाडून समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,महादेवराव माने ,सूरज ढेंबरे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २८):-दिनांक 15 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येरवडा, पुणे येथे चॅम्पियन्स कराटे क्लब, महाराष्ट्र आयोजित “चॅम्पियनस कप” या राष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये देशभरातून सुमारे 1000 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. खूप प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत फलटणच्या चॅम्पियनस कराटे क्लब च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये
1) श्रीशा जिंतुरकर- ब्राँझ मेडल
2) अनित पंडीत- 02 ब्राँझ मेडल
3) संचित सावंत- 02 ब्राँझ मेडल
4) आयुष संकपाळ- 02 ब्राँझ मेडल
5) शिवन्या शिंदे- 1 गोल्ड आणि 1 ब्रॉंझ मेडल
6) सूरज जाट- 02 ब्राँझ मेडल
7) आयुष भिसे- 1 सिल्व्हर आणि 1 ब्राँझ मेडल
8) ध्रुवी मेहता- 02 ब्राँझ मेडल
9) पूर्वा घनवट- 02 ब्राँझ मेडल

कु. वेदांतिका विक्रम पवारचे अभिनंदन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व सूरज ढेंबरे
10) वेदांतिका विक्रम पवार- ब्राँझ मेडल
11) सोहम बनसोडे- 2 सिल्व्हर मेडल
12) शंतनू जाधव- ब्राँझ मेडल
13) शौर्य शहा – गोल्ड मेडल आणि सिल्व्हर मेडल
14) आर्यन पाटोळे- ब्राँझ मेडल
15) आयेशा शेख- सिल्व्हर मेडल
16) पृथ्वीराज कर्वे- सिल्व्हर मेडल आणि ब्राँझ मेडल
फलटणच्या चॅम्पियनस कराटे क्लबच्या 16 खेळाडूंनी 27 मेडल जिंकले यामध्ये 02 गोल्ड मेडल 06 सिल्व्हर मेडल 19 ब्राँझ मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली व चॅम्पियनस कप पुणे या स्पर्धेत मोठ्या कामगिरीची नोंद केली
या ऐतिहासिक कामगिरी बद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री. सिहान संतोष मोहिते (चॅम्पियन कराटे क्लब संस्थापक), क्रीडा शिक्षक तसेच कराटे प्रशिक्षक सुरज ढेंबरे सर व प्रिया शेडगे मॅडम यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण -कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितेचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे , फलटण एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळा चे सर्व पदाधिकारी,फलटण एजुकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम , तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा ,प्राचार्या सॉइ मीनल दिक्षित- शेंडे , शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य व क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.
