
उज्वला शिंदे यांचा सन्मान करताना लीनेंस क्लबच्या सदस्यां
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ०१):-
लिनेस क्लब ऑफ इंडिया मल्टिपल चतुर्भुजा डिस्ट्रिक्ट दिव्यध्वनी MH 2 लीनेस क्लब ऑफ बारामती च्या अध्यक्षपदी उज्वला हेमचंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष व नवीन कार्यकारणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा प्रमुख पाहुण्या पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ली. प्रांजलजी गुंजोटे, सुमनजी जाचक, धनश्रीजी गांधी, माजीं अध्यक्षा उल्काताई जाचक आणि सर्व लीनेस सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला.
लीनेस क्लबच्या सेक्रेटरीपदी पुनम जाधव, सह सेक्रेटरी राधिका जाचक, खजिनदार मनीषा खेडेकर, सह खजिनदार संगीता मेहता यांची निवड करण्यात आली.
सदस्यपदी लीनेस आरती सातव, सीमा चव्हाण, निधी मोता, निशा जाचक, वैशाली वागजकर, साधना जाचक, रिनल शहा, नेहा सराफ, पल्लवी शहा, भैरवी गुजर, लता ओसवाल, जयंती सावंत, संगीता जाचक यांची आणि पीआरओ पदी अंजली संगई यांची तसेच विजया कदम यांची समन्वय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमात कृष्णदृष्टी स्पेशालिटी नेत्र रुग्णालय बारामती तर्फे डॉ. दिपाली शिंदे यांनी नेत्रदान करण्याची प्रक्रिया समजावून सांगून नेत्रदान संमती फॉर्म भरून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा यादव व निशा जाचक यांनी केले. आभार प्रदर्शन पुनम जाधव यांनी केले
