फलटण येथे १ ली ते १२ वी च्या सर्व शिक्षकांचे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० उत्साहात संपन्न

नवीन शैक्षणिक धोरण २०२०/ २.० शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण प्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना अधिव्याख्याता श्री.डॉ. सतिश बबनराव फरांदे साहेब व उपस्थित इतर मान्यवर

अधिव्याख्याता श्री.डॉ. सतिश बबनराव फरांदे साहेब यांचा सत्कारकरताना सौ दमयंती कुंभार मॅडम,प्राचार्य श्री संजय वेदपाठक व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.०३ मार्च २०२५):-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण व पंचायत समिती फलटण शिक्षण विभागातर्फे श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण मध्ये नवीन शैक्षणिक धोरण २०२०(NEP Training २.०शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण ) संपन्न झाले. ३ टप्प्यात पार पडले हे प्रशिक्षण सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होते. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयक वैशिष्ट्ये,स्वरूप, कौशल्य,राबवणूक ,शालेय शिक्षण नवीन आकृतिबंध(५+३+३+४), समग्र प्रगती पत्रक,SQAAF या विषयी सविस्तर माहिती यावेळी आयोजित प्रशिक्षणात प्राथमिकचे सुलभक म्हणून सौ.दमयंती कुंभार,श्री रवींद्र लटिंगे,श्री संजय भोसले,श्री दत्तात्रय नाळे ,श्री.मतिनशेख, विशाल खताळ, विजय रिटे , धुमाळ,सौ.स्मॄती जाधव,निलम कोकाटे, सिमा भोईटे, अश्विनी जाधव व माध्यमिक सुलभक म्हणून श्री सस्ते,श्री शिपटे, श्री रवींद्र सावंत,श्री संपत कावळे, श्री मिलिंद शिंदे ,सौ वैशाली कांबळे,सौ शारदा निंबाळकर, तुषार कदम, रवींद्र कोकरे, पंकज बोबडे,भाकरे,पोपट गांगुर्डे,प्रदिप माने,हेमा कदम , शशिकांत वळवी यांनी वरील गोष्टींचे सविस्तर मार्गदर्शन केले. यात फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खाजगी शिक्षण संस्थेतील प्राथमिक,माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक च्या सर्व अनुदानित म्हणजेच इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व शिक्षकांचा सहभाग होता, यामध्ये सर्व शिक्षकांनी उत्साहाने भाग घेतला व आपल्या क्षमता वृद्धीसाठी शासनाने ज्या ध्येय, धोरणांनी हे प्रशिक्षण दिले त्याचा अभ्यास करून आपले सहभाग नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले.

नवीन शैक्षणिक धोरण २०२०/ २.० शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण प्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सौ दमयंती कुंभार मॅडम व इतर मान्यवर


या प्रशिक्षणासाठी फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री अनिल नाथ्याबा संकपाळ साहेब , अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण,सातारा श्री.डॉ. सतिश बबनराव फरांदे साहेब व तालुका समन्वयक विषय साधनव्यक्ती बी आर सी फलटणच्या सौ दमयंती कुंभार मॅडम यांनी शिक्षण विषयक क्षेत्रे, स्कॉफ परिशिष्टे १ ते ८ या विषयी माहिती देऊन सखोल असे मार्गदर्शन केले.शिक्षकांना तीन टप्प्यांमध्ये ५ दिवसीय प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे, असे सौ दमयंती कुंभार यांनी सांगितले. सुलभक श्री मिलिंद शिंदे व इतर शिक्षक सहकाऱ्यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन यशस्वीरीत्या पार पडले.

यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम सर यांनी प्रशिक्षण स्थळी भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की नुसते पुस्तकी शिक्षण घेऊन उपयोग नाही त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणे गरजेचे आहे ही काळाची गरज असून त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना प्रशासन अधिकारी मा. श्री अरविंद निकम सर व इतर मान्यवर

या प्रशिक्षणासाठी सर्व प्रशिक्षणार्थींची बैठक व्यवस्था,जेवणाची व्यवस्था उत्तम करण्यात आली होती तसेच या प्रशिक्षणामधून नवनवीन संकल्पना शिकण्यास मिळाल्या ज्यांचा वापर विद्यार्थी घडवण्यासाठी उपयुक्त आहे अशा प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थीं मधून मिळाल्या .यावेळी अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, सातारा श्री.डॉ. सतिश बबनराव फरांदे साहेब यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीचे व प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम सर यांचे भौतिक सुविधा उपलब्ध केल्याबद्दल आभार मानले. श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुला मध्ये प्रशिक्षण उत्साहात पार पडले या प्रशिक्षणासाठी श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री.संजय रामकृष्ण वेदपाठक ,श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर,सस्तेवाडीच्या मुख्याध्यापिका अनिताराणी कुचेकर मॅडम. मनोज कदम सर, उत्तम घोरपडे सर,योगेश भिसे सर यांनी सहकार्य केले व प्रशिक्षण खेळीमेळीत पार पडल.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!