वेतन वाढ मधील फरकासाठी एमआयडीसी एसटी कामगारांची निदर्शने

विभागीय कार्यशाळा एमआयडीसी येथे एसटी कर्मचारी निदर्शने करताना

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-
वार्षिक वेतन वाढ तीन टक्के प्रमाणे द्या, मागील फरक द्या, फरकाची रक्कम दर महिन्याच्या वेतनात अदा करावी यासह अन्य विविध प्रलंबित मागण्यासाठी बारामती एमआयडीसी येथील विभागीय कार्यशाळा मधील कर्मचाऱ्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी एसटी कामगार विभागीय कार्यशाळा अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, सचिव नंदकुमार जाधव, व अमरदीप गवळी, आकाश शिरसाट, राजाराम खोमणे, मनोज जगताप, संजय जगताप, मीथून निगडे, नंदकुमार कदम ,दत्ता बनसोडे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो, हम सब एक हे ,कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही ,वाढीव महागाई भत्त्याची रक्कम मिळालीच पाहिजे, राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्ता मिळाला पाहिजे आदी घोषणा देण्यात आल्या.
एसटी कर्मचारी व संघर्ष हे कायमच नाते आहे तरी राज्य शासनाला घाम फुटत नाही ही दुर्दैवी बाब आहे स्त्री 2025 मध्ये फरकाची रक्कम मिळावी अशी अपेक्षा आम्ही कर्मचारी करत असल्याचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!