फलटणचा राजवीर धीरज कचरे ठरला ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन…

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब) यांनी केले अभिनंदन.

पंढरपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मैदानी क्रीडा स्पर्धेत सलग तीन वर्षे ठरला वेगवान धावपटू…

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १०):-

पंढरपूर येथे दिनांक २३ व २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत फलटणचा राजवीर धीरज कचरे याने १० वर्षाखालील गटात १०० मीटर धावणे व ५० मीटर धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये सलग तीन वर्ष सुवर्णपदक मिळविले, राजवीर कचरे हा गुणवान वेगवान धावपटू फलटण एज्युकेशन सोसायटी’च्या स्व.शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्या मंदिर, कोळकी ता.फलटण या ठिकाणी इयत्ता ४ थी मध्ये शिकत आहे, या यशस्वी खेळाडूला फलटण एज्युकेशन सोसायटीचे मैदानी खेळाचे प्रशिक्षक श्री.राज जाधव सर, श्री.तायाप्पा शेंडगे (सर), महाराष्ट्र पोलीस श्री.सचिन फाळके, श्री.धीरज कचरे (सर), सौ.रुपाली कचरे यांनी मार्गदर्शन केले. फलटणच्या या गुणवान वेगवान धावपटूचे महाराष्ट्र विधान परिषद मा.सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.आमदार श्री.दिपकराव चव्हाण साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण’चे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन’चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), फलटण नगर परिषद मा.ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), सातारा जिल्हा परिषद मा.सदस्या श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (वहिणीसाहेब), युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर (बाबा), पंचायत समिती, फलटण मा.सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), गोविंद मिल्क, संचालक श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), फलटण एज्युकेशन सोसायटी’चे प्रशासन अधिकारी श्री.अरविंद निकम (सर), स्व.शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्या मंदिर, कोळकी’च्या मुख्याध्यापिका सौ.प्रज्ञा काकडे मॅडम, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व फलटण शहर व तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!