
सेंट्रल संस्कृत संस्थान शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्रशालेचे प्राचार्य वसंत शेडगे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि .१४ मार्च २०२५):-
फलटण एन्युकेशन सोसायटी संचालित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील ९ विद्यार्थ्यांना सेंट्रल संस्कृत संस्थान जनकपुरी नवी दिल्ली यांच्या विद्यमाने संस्कृत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या प्रशालेतील ९ वी ते ११ वी दरम्यान शिकत असलेल्या नऊ विद्यार्थ्यांनची निवड गुणवत्तेनुसार करण्यात आली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०००/- रुपये एक वर्षासाठी शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षिका सौ पाटील पी व्ही.उपशिक्षिका सौ कल्याणकर जे.डी. यानी मार्गदर्शन केले आहे
संस्कृत शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी कु सई शिंदे , प्रथम् दोशी, कु मृणाल कदम, सोहम नाळे, कु अनुष्का सपाटे, शिवम शिंदे, पियूष दोशी, कु सिमरन गांधी, कु सिद्धी शिंदे यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका पर्यवेक्षिका सौ पाटील पी व्ही. उपशिक्षिका सौ कल्याणकर जे.डी. यांचे विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी तथा माजी प्राचार्य मा.श्री अरविंद निकम ,तपासणी अधिकारी मा.श्री दिलीप राजगुडा, प्रशालेचे प्राचार्य मा. श्री वसंत शेडगे,माध्यमिकचे उपप्राचार्य मा. श्री नितीन जगताप, ज्युनियरचे उपप्राचार्य मा. श्री सोमनाथ माने यांनी त्यांचं अभिनंदन केले केलं.
