
जागतिक महिला दिनानिमित्त प्रशाळेत श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करताना श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमती वैशाली गाडे,प्राचार्य श्री वसंत शेडगे, नितीन जगताप, सोमनाथ माने,सौ.पूजा पाटील
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.१४ मार्च २०२५):-
८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधिल ड्रॉइंग हॉलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका मा. श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रमुख पाहुण्या एडव्होकेट मा.श्रीमती वैशाली गाडे यांच्या शुभहस्ते श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. प्रशालेचे प्राचार्य मा श्री वसंत शेडगे, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य मा नितीन जगताप, ज्युनियर कॉलेज विभागाचे उपप्राचार्य मा सोमनाथ माने , माध्यमिकच्या पर्यवैक्षिका सौ.पूजा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर प्रशाळेच्या प्रांगणात महिला पालक व महिला शिक्षिका , सेवक महिला व विद्यार्थिनी यांचा संगीत खुर्चीचा कार्यक्रम पार पडला सर्व महिलांनी व विद्यार्थिनीनी या कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.यामध्ये प्रथम तीन क्रमांकाला पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित महिलांचे व विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की ‘प्रत्येक स्त्रीने आपले मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे कारण त्याचा परिणाम कुटुंबावर आणि पर्यायाने समाजावर होतो’ अशा भावना व्यक्त केल्या. तसेच महिलाचे साक्षिमीकरण यावर भरदिला गेला पाहिजे व त्याला कसे बळ दिले गेले पाहिजे यावर आपले विचार व्यक्त केले . तसेच सध्या मुलींच्या मोबाईल वापरासंबंधी योग्य मार्गदर्शन केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या

यावेळी प्रमुख पाहुण्या एडव्होकेट मा.श्रीमती वैशाली गाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलासाठी कायदे काय आहेत तसेच मुलिनी पुढील जीवन जाताना भविष्यात कसे रहावे वागावे याचे उत्तम मार्गदर्शन केले.
तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री वसंत शेडगे यांनी यावेळी सर्व महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ‘स्त्रियांना अनेक पातळ्यांवर लढावे लागते पण स्त्रियांमध्ये जन्मताच संयम आणि ताकद असते’ अशी भावना व्यक्त केली.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधिल महिला शिक्षिका यांनी उत्तम केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ वनिता लोणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. लतिका अनपट यांनी केले.
