
तेजज्ञान फाउन्डेशन बारामती यांच्या वतीने महिला दिन साजरा करताना
फलटण टुडे (बारामती दि १४ मार्च २०२५):-
८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांसाठी ‘नवीन जीवनाकडे एक पाऊल’ हा कार्यक्रम ज्ञान ध्यान केंन्द्र बारामती येथे घेण्यात आला. तेजज्ञान फाउन्डेशन चे संस्थापक सरश्री यांचे अनमोल मार्गदर्शन सर्वाना लाभले. स्वतःला जाणून घेऊन, स्वतःला सुधारुन आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. स्वतःला समजून घेण्याची आणि स्वतःची आंतरिक शक्ती ओळखण्याची समझ देण्यात आली. तणाव आणि चिंता यापासून मुक्त कसे व्हावे? तसेच सकारात्मक विचार करण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची कला देखील शिकवण्यात आली.
आध्यात्मिक गुरु सरश्री निर्मित महाआसमानी परमज्ञान शिविर १६ ते २० एप्रिल आणि २१ ते २५ मे २०२५ हे ५ दिवसीय निवासी शिविर मनन आश्रम पुणे येथे होत आहे. या शिविरामध्ये आपण कोण आहोत? पृथ्वी वर कशासाठी आलो आहोत? आपल्याला जीवना चे अंतिम उद्देश्य काय आहे? अशा अनेक जीवना आवश्यक विषयांवर मार्गदर्शन मिळणार असून, प्रत्येक व्यक्ति ने याचा लाभ घेणे किती महत्वपूर्ण आहे हे देखिल बारामती येथील या कार्यक्रमात सांगण्यात आले.
या प्रसंगी बारामती तालुका व परिसरातील हॅप्पी थॉट्स परिवारातील महिलांनी सहभाग घेतला
