जी.डी.सी. अॅण्ड ए .व सी. एच. एम. परीक्षेचा अर्ज भरण्यास 17 मार्चपर्यंत मुदतवाढ

फलटण टुडे (सातारा दि.१४ मार्च २०२५):-

जी.डी.सी. अॅण्ड ए .व सी. एच. एम. परीक्षा, २०२५ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ मार्चच्या रात्री ८ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.२४ मार्च 2025 पर्यंत (बँकेच्या कामकाजाच्या वेळेत) करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.  

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.अॅण्ड ए. बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अॅण्ड ए.) परीक्षा-२०२५ व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा-२०२५, दिनांक २३, २४ व २५ मे, २०२५ रोजी घेण्यात येणार असल्याचेही श्री. सुद्रिक यांनी कळविले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!