
अकॅडमी चा शुभारंभ करताना प्रताप पागळे,धनंजय जमदाडे व इतर
फलटण टुडे (बारामती दि २० मार्च २०२५):-
क्रिकेट क्षेत्रात ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे मैदान प्राप्त व्हावे व त्यांच्यामधील खेळाच्या विविध गुणांना वाव भेटावा व तालुका, जिल्हा,राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण व्याहवेत या साठी खेळाडूचा सराव, व्यायाम ,आहार व योग्य प्रशिक्षक मार्गदर्शन मिळावे म्हणून जळोची येथे सुपर स्ट्राईकर्स क्रिकेट अकॅडमी चा शुभारंभ शनिवार दि.१५ मार्च रोजी पुणे जिल्हा राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष प्रताप पागळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी दादासाहेब दांगडे संघमालक सुपर स्ट्राईकर्स धनंजय जमदाडे,इंद्रजित साळवे, सुरज जाधव, समर्थ निकम व मयूर ढवान, वसीम शेख, विजय शिंदे, गजानन आटोळे ,योगेश वटकर, सचिन दातीर, गणेश ढेरे ,प्रदीप सुर्वे ,वैभव पळसे आदी उपस्तीत होते.
राज्यस्तरीय प्रशिक्षक च्या माध्यमातून सकाळी व सायंकाळी सत्रात खेळाडूंना मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती संयोजक यांनी दिली
धनंजय जमदाडे यांनी आभार मानले