फलटण बाजार समितीमध्ये तूर हमीभाव खरेदी सुरु


फलटण टुडे (फलटण दि. २१ मार्च २०२५) :

कृषि उत्पन्न बाजार समिती फलटणच्या मुख्य बाजार आवारात, नाफेड व तालुका खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातून तूर हमीभाव खरेदी केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल 7550 रुपये हमीभावाने खरेदी करण्यात येणार असल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
नाफेड मार्फत हंगाम 2024- 25 मध्ये तूर खरेदीसाठी नाव नोंदणी सुरु झाली असून दि. 25 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केली नाही, त्यांनी मुदतीत नाव नोंदणी करावी असे आवाहन बाजार समितीचे व्हा.चेअरमन श्री. भगवानराव होळकर यांनी केले आहे.
बाजारामध्ये तूर शेतमालाचे भाव पडल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले असून याकरिता सब एजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवड करण्यात आली आहे.
तूर या शेतमालाचा हमीभाव 7550 रुपये प्रति क्विंटल असून, कमाल आर्द्रता 12 टक्के आवश्यक आहे.
सन 2024-25 च्या हंगामात 7/12 वर तूर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. सरासरी उत्पादकता विचारात घेता प्रति हेक्टरी 7 क्विंटल तूर खरेदी केली जाणार आहे.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येणार आहे, त्याचदिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा असे आवाहन समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.
हमीभाव खरेदी बाबत अधिक माहितीसाठी फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक श्री.विठ्ठल जाधव मो.नं 7972417546 व समितीचे क.लिपिक श्री. स्वप्नील देशमुख मो.नं. 9860573727 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!