
रक्तदात्यास प्रमाणपत्र देताना जय पाटील, अक्षय शेरे व अविनाश बांदल आणि इतर मान्यवर
फलटण टुडे (बारामती दि २२ मार्च २०२५):-
स्व रघुनाथ कृष्णा शेरे पाटील चौक प्रतिष्ठान जळोची व श्री सिद्धिविनायक मेडिटेक फाउंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दि.२३ मार्च रोजी जळोची येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उदघाटन प्रसंगी प्रांताधिकारी वैभव नावडकर ,एमआयडीसी चे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत पाटील,
तहसिलदार गणेश शिंदे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड
व राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे , शहर अध्यक्ष जय पाटील,अविनाश बांदल व
प्रशांत शिंदे पाटील ,अतुल बालगुडे, दीपक मलगुंडे, सुनील सस्ते,प्रमोद ढवाण ,माणिक मलगुंडे, प्रवीण माने,ऋषिकेश फाळके, अक्षय माने
श्रीरंग जमदाडे, सचिन जमदाडे धनंजय जमदाडे, दादासाहेब दांगडे, शैलेश बगाडे, किरण फरांदे ऍड अमोल सातकर स्वप्निल कांबळे वैभव लोंढे उपस्तीत होते .
विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये व शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याने आणि रक्तदान हीच खरी माणुसकी व काळाची गरज असल्याने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे
आयोजक
अक्षय शेरे ,शुभम शेरे दादासाहेब शेरे आकाश शेरे, गणेश शेरे , मोहित शेरे व सिद्धिविनायक मेडिटेक फाउंडेशन चे अध्यक्ष संजय बनसोडे यांनी सांगितले .
श्री महाकालेश्वर स्पोर्ट क्लब जळोची व मुक्ताई ब्लड बँक व विविध क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी सदर रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला ३५० रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केले.आभार अक्षय शेरे यांनी मानले