तांदुळवाडी मध्ये जागतिक वन दिन साजरा

पाणवठ्या मध्ये टँकर ने पाणी सोडताना फोरमचे सदस्य व वन विभागाचे अधिकारी


फलटण टुडे (बारामती,दि २३ मार्च २०२५):-
जागतिक वन दीना निमित्त (शुक्रवार २१ मार्च ) तांदळवाडी येथील वन विभागाच्या हद्दीतील पानवटे मध्ये वन्यजीव यांच्या साठी टँकर च्या साह्याने पाणी सोडण्यात आले .
खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने सदर उपक्रम हाती घेण्यात आला असून या प्रसंगी फोरमचे सदस्य सुनीलकुमार मुसळे ,सचिन पवार, व फोरमचे सदस्य आणि बारामती वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी
श्रीमती अश्विनी शिंदे, वनपाल संतोष उंडे, वनरक्षक बाळासो गोलांडे, वन मजूर प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.
बारामती परिसरातील विविध वनविभागाच्या हद्दीमधील पाणवठ्या मध्ये वन्य जीव यांच्या साठी टँकर ने पाणी सोडणे व नवीन पानवठे तयार करणे आदी उपक्रम हाती घेण्यात आलेले असल्याचे फोरम च्या वतीने सांगण्यात आले.
उन्हाळा मध्ये वन्य जीवांचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे .
वन्यजीवांची संरक्षण करा वन्य जीवावर प्रेम करा, कोणत्याही अपघात प्रसंगी वन्यजीवाला वाचवण्याचा प्रयत्न करा, जंकल ला वनवा लावू नका, लावणाऱ्या पाठीशी घालू नका अशी वनवा लावणारे बद्दल तक्रार कळविल्यास त्याचे नाव गुपित ठेवून तिला बक्षीस दिले जाईल अशी माहिती वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी दिली
आभार वनपाल संतोष उंडे यांनी मानले


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!