हिंदुस्थान फीड्स चा स्नेह मेळावा संपन्न

उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सचिन माने व व्यासपीठावर इतर मान्यवर
फलटण टुडे (बारामती दि २५ मार्च २०२५):-
कंपनीच्या प्रगती मध्ये कर्मचाऱ्यांची साथ ,योगदान व सहकार्य बहुमोल आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नेहमी कटीबद्ध राहू असे प्रतिपादन बारामती कॅटल फीड्स चे व्यवस्थापकीय संचालक सचिन माने यांनी प्रतिपादन केले.
शनिवार २२ मार्च रोजी कंपनीच्या चालकांचा व कुटूंबियांचा
सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सचिन माने कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते
या जनरल मॅनेजर अजय पिसाळ,एच आर हेड अमोल धायगुडे, फॅक्टरी मॅनेजर सुनील खोमणे, अकाऊंट मॅनेजर अमित पोरे, कस्टमर केअर हेड अमृतराज निंबाळकर
आदी अधिकारी व कर्मचारी उपस्तीत होते.
कर्मचाऱ्यांनी आर्थिक नियोजन उत्तमरीत्या केल्यास कौटुंबिक जवाबदारी सहज पार पाडू शकतात त्याच प्रमाणे कंपनीच्या वतीने विमा सेवा देणार असल्याचे सचिन माने यांनी सांगितले.
कंपनी म्हणजे कुटूंब मानून चालक सेवा करत असल्याने सत्कारास पात्र असल्याचे जनरल मॅनेजर अजय पिसाळ यांनी सांगितले
या प्रसंगी विना अपघात,जास्त वर्ष सेवा देणाऱ्या चालकांचा व कुटूंबियाचा सन्मान करण्यात आला
चालकांचा व कुटूंबियाचा सत्कार केल्याने व आपुलकीची थाप पाठीवर दिल्याने चालकाची जवाबदारी वाढली असल्याचे चालक प्रतिनिधी यांनी मनोगत मध्ये सांगितले
सांज या कार्यक्रमाचे सादरीकरण केंजळे दाम्पत्याने व सहकाऱ्यांनी केले तर सूत्रसंचालन सावळेपाटील व आभार प्रदर्शन अमृतराज निंबाळकर यांनी केले