
मुन्ना यांचा सत्कार करताना मान्यवर
फलटण टुडे ( बारामती दि ०३ एप्रिल २०२५):-
बुधवार दि २ एप्रिल रोजी कोकण येथून बारामती मध्ये क्रिकेटच्या सामन्या निमित्त आलेले श्री कांबळे हे वीर सावरकर स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी आले असता त्यांची दोन तोळ्याची सोन्याची चैन टँक मध्ये पडली असल्याचे त्यांच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आले.
गुरुवारी ३ एप्रिल रोजी (दुसऱ्या दिवशी) सकाळी स्विमिंग पूल वरती येऊन त्यांनी या घटनेची माहिती दिली क्लबचे लाईफ गार्ड करण शेंडगे उर्फ मुन्ना यांनी त्यांची चौकशी करून त्यांचा मोबाईल नंबर घेतला व स्विमिंग पूल चे पाणी शांत झाल्यानंतर करण शेंडगे (मुन्ना) यांनी पाण्यामध्ये उतरून दोन ते तीन तास चैन चा शोध घेतला असता त्यांना सदरील सोन्याची चैन आढळून आली सदरील चैन व्यवस्थापक सुनील खाडे यांच्या कडे जमा करून श्री कांबळे यांना बोलावून त्यांची चैन असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना त्यांची साखळी देण्यात आली. श्री कांबळे यांनी करण शेंडगे यांचे खूप खूप आभार व्यक्त केले
सदरील कामगिरीची दखल घेऊन वीर सावरकर स्विमर्स क्लबचे ज्येष्ठ सल्लागार जवाहर शहा वाघोलीकर, माजी सचिव प्रवीण आहुजा संचालक अमोल गावडे बाळासाहेब टाटीया उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर सभासद सुनील जामदार राहुल नेवसे अशोक शेरकर बाळासाहेब देवकाते नामदेव मदने सचिव विश्वास शेळके अध्यक्ष डॉ अशोक तांबे खजिनदार मिलींद अत्रे व्यवस्थापक श्री सुनील खाडे यांनी सत्कार केला