प्रा मनिषा गायकवाड यांना पीएच.डी.प्रदान.

प्रा मनिषा गायकवाड


फलटण टुडे (बारामती दि ०३ एप्रिल २०२५):-
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. मनिषा खंडू गायकवाड यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून विद्यावाचस्पती ( पीएच.डी) ही पदवी जाहीर झाली. प्रा. मनिषा गायकवाड यांनी ” बारामती लोकसभा मतदारसंघातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माहिती साक्षरता कौशल्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयातून पीएच.डी पदवी मिळवली.त्यांना क.ब .चौ.उ.म. विद्यापीठाच्या माहिती आणि ज्ञानस्त्रोत केंद्राचे माजी संचालक डॉ. अनिल चिकाटे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. गायकवाड यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केल्याबद्दल इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धन पाटील सचिव मा.चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तसेच बारामती हाय टेक्स्टाईल पार्क मधील कॉटनकिंग परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!