महाराष्ट्र राज्याच्या दूध उत्पादक संघटनेच्या अध्यक्षपदी नानासाहेब थोरात यांची निवड

नानासाहेब थोरात

फलटण टुडे (बारामती दि ०३ एप्रिल २०२५):-
बारामती एमआयडीसी येथील श्रायबर डायनामिक्स डेअरीज अँड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांची महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

या प्रसंगी उपाध्यक्ष के डी पाटील कोल्हापूर गोकुळ दूध संघ, सरचिटणीस पदी बापूराव जाधव सोलापूर, खजिनदारपदी संतोष साळुंखे पुणे, व सदस्य मच्छिंद्र चिने नाशिक, चंद्रकांत माने सातारा, विश्वास पाटील कोल्हापूर ,तानाजी ताकवले पुणे, राजेंद्र कोकाटे नाशिक, नवनाथ जाधव सोलापूर, प्रमोद जगताप सातारा यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक आणि कामगार युनियन ही कायदेशीररित्या नोंदणीकृत कामगार संघटना आहे, जी दुग्ध पुरवठा साखळीतील लहान आणि मध्यम शेतकरी आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करते. ही संघटना महाराष्ट्रात हजारो दुग्ध उत्पादक आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करते
राज्यातील लाखो कष्टकरी लहान आणि मध्यम शेतकरी/दुग्ध कामगारांच्या हक्कांचे रक्षण आणि प्रगती करून त्यांच्या सन्मानासाठी लढा देत असताना
लहान आणि मध्यम दुग्ध उत्पादक शेतकरी आणि दुग्ध कामगारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. परंतु सरकारी पाठिंब्याअभावी आणि वाढत्या कामगारविरोधी पद्धतींमुळे, अनेक लहान आणि मध्यम शेतकरी उद्योग सोडण्याचा पर्याय निवडतात
ही संघटना या सर्व वेगवेगळ्या भागधारकांना संघटित करत राहील, त्यांच्या हक्कांसाठी लढत राहील जेणेकरून दुग्ध उद्योग सर्वांसाठी अधिक शाश्वत होईल. भारतीय ग्राहकांना चांगल्या दर्जाचे दूध पुरवण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या या दुग्ध उद्योग कामगारांना अत्यावश्यक कामगार म्हणून मान्यता मिळावी यासाठीही लढा उभा करणार आहे
आंतरराष्ट्रीय अन्न कामगार संघटनेचे (IUF) मार्गदर्शन आणि पाठिंबा असून IUF ही आंतरराष्ट्रीय कामगार महासंघ आहे, जी १२६ देशांमधील अन्न कामगारांचे प्रतिनिधित्व करते आणि जागतिक दुग्ध कंपनी आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेसह संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांनी मान्यता दिली आहे.

“बालकापासून ते ज्येष्ठा पर्यंत अर्थातच प्रत्येक मानवास गुणवत्ता दर्जात्मक आणि रसायन मुक्त दूध मिळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रत्यन करणार आहे ” निवडीनंतर नानासाहेब थोरात यांनी सांगितले

————————–/—-

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!