क्रेडाई फलटणच्या अध्यक्षपदी युवराज निकम तर उपाध्यक्षपदी पृथ्वीराज कदम यांची निवड

फलटण टुडे (फलटण दि०५ एप्रिल २०२५):-
फलटण क्रेडाईच्या पदग्रहण समारंभ नुकताच फलटण क्रेडाईच्या श्रीराम टॉवर येथील कार्यालयात संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाई महराष्ट्राचे अध्यक्ष मा श्री प्रफुल्लजी तावरे, क्रेडाई महाराष्ट्र खजिनदार मा श्री सुरेंद्रजी भोईटे उपस्थित होते.

या कार्यक्रमची सुरवात सर विश्वेश्वरया यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या वेळी मावळते अध्यक्ष श्री अनिल निंबाळकर यांनी मान्यवर पाहुण्यांचे व उपस्थित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व आपल्या प्रस्ताविकपर भाषणात सन २०२३ -२०२५ चा क्रेडाई फलटणचा कार्यकालीन आढावा सादर केला. यावेळी दोन वर्ष्याचे कामकाजाचाची दखल घेत क्रेडाई महाराष्ट्राने क्रेडाई फलटणला गौरवीत केले व सन २३ – २५ साठी क्रेडाई फलटणला मिळालेल्या प्रथम क्रमांकाचे बेस्ट सिटी चॅप्टर अवॉर्ड ची माहिती सर्व उपस्थितांना करून दिली.

यावेळी श्री उमेश नाईक निंबाळकर यांनी क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्षश्री प्रफुल्लजी तावरे यांचा सत्कार केला तर खजिनदार सुरेंद्र भोईटे यांचा सत्कार श्री राजीव नाईक निंबाळकर यांनी केला. क्रेडाई बारामतीचे उपाध्यक्ष श्री जाचक साहेब यांचा सत्कार श्री अनिल निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला

यावेळी क्रेडाई फलटण २०२५-२०२७ चा मुख्य पदग्रहण समारंभ पार पडला यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून श्री युवराज निकम तर उपाध्यक्षपदी श्री पृथ्वीराज कदम , सचिवपदी श्री सुहास निंबाळकर, खजिनदारपदी श्री विशाल राजमाने सहसचिव पदी श्री किशोर देवकर यांची कायम नियुक्ती पुढील कार्यकाळासाठी ठेवली गेली तर वूमन विंगचा कनव्हेनरपदी सौ स्वप्ना शहा यांच्याकडे सोपवण्यात आला व को-कनव्हेनरपदी सौ स्वती जाधव यांची निवड करण्यात आली. युथ विंगची सूत्रे श्री शिवतेज ना.निंबाळकर तर श्री शंभुराज बोबडे यांनी को कनव्हेनर युथ विंग म्हणून आपला कार्यभार स्वीकारला

यावेळी श्री महेंद्र जाधव यांनी क्रेडाई फलटण स्थापने पासूनची सर्व संदर्भीय गोष्टींना उजाळा दिला.तर क्रेडाई महराष्ट्र अध्यक्ष प्रफुलजीनी आपल्या भविष्यातील योजनांचा आढावा मांडतानाच क्रेडाई फलटण युथ व वूमन विंगचे विकासासाठी करणाऱ्या ठोस योजणांची माहिती दिली. क्रेडाई महाराष्ट्र खजिनदार श्री सुरेंद्रजी भोईटे यांनी क्रेडाई महाराष्ट्राचे पुढील उद्धिष्ठे मांडतानाच क्रेडाई बारामतीतील कार्यन्वीत सर्व योजणांची माहिती सादर केली . यावेळी श्री केदार कारवा यांनी फलटण युथची क्रेडाई महाराष्ट्रकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करताना आपले विचार व्यक्त केले. तर वूमन विंगच्या वतीने आपल्या मागण्या व गरजांची मांडणी सौ वंदनाताई निंबाळकर यांनी क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष्यान समोर मांडल्या

कार्यक्रमाला वूमन विंग ,युथ विंग व मेन विंग सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे आभार सुहास निंबाळकर यांनी मानले.

चौकट:- नूतन अध्यक्ष श्री युवराज निकम यांनी आपल्या मनोगत सांगितले की हा पदग्रहण सोहळा म्हणजे क्रेडाई परिवारासाठी एक पुढच्या दिशेने टाकल गेलेले नवीन पाऊल आहे आणि निश्चितच आपणआगामी काही वर्षात फलटण क्रीडाईचा नावलौकिक असाच वाढूऊ असे सांगून आपली क्रेडाई फलटणसाठीची ध्येय धोरणे सर्वांसमोर मांडली

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!