
फलटण टुडे ( फलटण दि ०५ एप्रिल २०२५):-
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन(जितो)आणि जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या आवाहनानुसार दि ९ एप्रिल बुधवार रोजी संपूर्ण जगात नवकार महामंत्र पठणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
जैन सोशल ग्रुप फलटण व श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी ८ ते ९.३५ या वेळेत श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर फलटण येथे नवकार महामंत्र पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमां मध्ये संगिनी फोरम फलटण, युवा फोरम फलटण, सन्मती महिला मंडळ फलटण व श्री चंद्रप्रभू युवक संघटना फलटण सहभागी होणार आहेत. जागतिक शांतता, मानव जातीच्या कल्याणासाठी नवकार महामंत्र पठणाचा कार्यक्रम संपूर्ण जगात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यकक्रमास जिल्हा सत्र न्यायाधीश मा.श्री.प्रवीणजी चतुर साहेब , शहर पोलीस निरीक्षक मा.श्री. हेमंतकुमार शहा साहेब, ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.अरविंदभाई मेहता साहेब “सा.आदेश”चे श्री विशालभई शहा उपस्थित राहणार आहेत. जागतिक नवकार महामंत्र पठण कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जैन सोशल ग्रुप व श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
