
मुखधिकारी पंकज भुसे यांचा सत्कार करताना बिरजू मांढरे
फलटण टुडे (बारामती दि १७ एप्रिल २०२५):-
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत आमराई येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मा. उपनगराध्यक्ष बिरजू भैय्या मांढरे मित्र परिवार यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, मा उप नगराध्यक्ष भारत अहिवळे, राजेंद्र बनकर, बाळासाहेब जाधव व रमेश साबळे,शुभम अहिवळे, अरविंद बगाडे, शुभम ठोंबरे, उत्तम धोत्रे अरविंद बगाडे, सिद्धार्थ सावंत शुभम अहिवळे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदेश्याने सदर जयंती साजरी करताना तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुष यांचे प्रतिमेचे पूजन करून पूजा पाठ कार्यक्रम व नागरिकांना मिठाई वाटप करून सदर जयंती साजरी करीत असल्याचे आयोजक उप नगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सांगितले
विजय तेलंगे, किरण बोराडे, सोमेश सुतार ,राजू मांढरे ,ओंकार जाधव, चंद्रकांत कसबे ,महेश सुतार, नितीन फासगे, राहुल कसबे,धनंजय तेलंगे, सचिन मांढरे रामभाऊ नवगिरे,कालिदास बल्लाळ आदींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले उपस्तितांचे शाब्दिक स्वागत धनंजय तेलंगे यांनी केले
आभार राजू मांढरे यांनी मानले