देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण: वैशाली पाटील

जिजाऊ सेवा संघाच्या वतीने भाषणकला प्रशिक्षण संपन्न

पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या समवेत जिजाऊ सेवा संघाच्या भाषण कला प्रशिक्षणार्थी

फलटण टुडे (बारामती दि १७ एप्रिल २०२५):-
पूर्वीचा व आत्ताचा आधुनिक भारत देश यामध्ये खूप फरक आहे. विविध क्षेत्रात महिलांनी दिलेल्या योगदानामुळे देशाची प्रगती वेगाने झाली आहे व महिलांचे योगदान म्हतपूर्ण असल्याचे प्रतिपादन बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी प्रतिपादन केले

मराठा सेवा संघ व जिजाऊ सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी भाषणकला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्याच्या समारोप प्रसंगी ( मंगळवार १५ एप्रिल) प्रशिक्षणार्थी महिलांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात वैशाली पाटील बोलत होत्या

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव तुपे, कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे, विश्वस्त देवेंद्र शिर्के,
दीपक बागल, पोपटराव वाबळे व जिजाऊ सेवा संघाच्या माजी अध्यक्ष विजया कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड प्रियंका काटे, शहर अध्यक्ष अर्चना सातव तालुका अध्यक्ष ऍड सुप्रिया बर्गे उपाध्यक्ष ज्योती जाधव ऍड वीणा फडतरे व उद्योजक सुधीर शिंदे, वीर सावरकर स्वीमर्स क्लबचे सचिव विश्वास शेळके, प्रा गोरख जगताप ,वृषल भोसले आदी उपस्तीत होते.

महिलांनी संसार करताना मुलांचे संगोपन करीत विविध क्षेत्रातील वाचन करावे त्यामुळे मुलांना सुद्धा वाचनाची आवड निर्माण होते व विविध क्षेत्रातील कोणत्याही विषयात सहज बोलू शकाल आणि आपले मत व्यक्त करण्यासाठी भाषणकला ही काळाची गरज असल्याचे वैशाली पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी मनीषा शिंदे ,कल्पना माने, सारिका मोरे, सुनंदा जगताप,भारती शेळके ,पूजा खलाटे ,मनीषा खेडेकर, विद्या निंबाळकर, विना यादव , वंदना जाधव ,संगीता साळुंखे,गौरी सावळेपाटील
यांनी भाषणकला प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

भारती शेळके, सारिका मोरे ,पूजा खलाटे या या प्रशिक्षणार्थींनी मोबाईल शाप की वरदान, जिजाऊ भवन चे कार्य, पोलिसांचे कार्य आणि सुनंदा जगताप यांनी इंग्रजी मध्ये भाषण कला चे महत्व सांगितले.

गृहणी ना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्याचे विचार व्यक्त करता यावेत यासाठी भाषण कला महत्त्वाचे असल्याचे प्रास्ताविक मध्ये जिजाऊ सेवा संघाच्या उपाध्यक्ष मनीषा शिंदे यांनी सांगितले
भाषणकला प्रशिक्षक अनिल सावळेपाटील यांनी भाषणकला तंत्र व मंत्र चे जीवनातील महत्व विशद केले

मान्यवरांचा परिचय कल्पना माने यांनी करून दिला , सूत्रसंचालन विना यादव व आभार मनीषा खेडेकर यांनी मानले


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!