कु.शर्वरी चेतन बोबडे हिचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश

कु.शर्वरी चेतन बोबडे

फलटण टुडे (फलटण दि १७ एप्रिल २०२५):-
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय तसेच बाह्य परीक्षांमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या कुमारी शर्वरी चेतन बोबडे हिने जिद्द, चिकाटी, मेहनत व स्वयंअध्ययन या गुणांच्या जोरावर यश मिळवले आहे. बालवयापासूनच आपल्या बुद्धीची चुणुक दाखवत एक उत्कृष्ट बालवक्ता म्हणून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.International maths Olympiad तसेच computer Olympiad मध्ये zonal रँकिंग सह गोल्ड मेडल व स्कॉलरशिप मिळवली . शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत 150 पैकी 146 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावला. जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये 200 पैकी 194 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावला. यशाची परंपरा कायम ठेवत फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन सामान्य परीक्षेत 150 पैकी 150 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!