
राजाराम सातपुते व प्रवीण जगताप यांना निवडीचे पत्र देताना उपमुख्यमंत्री अजित पवार
फलटण टुडे (बारामती दि १७ एप्रिल २०२५):-
बारामती एमआयडीसी येथील व्ही आर बॉयलर्स सोल्यूशन प्रा ली चे संचालक राजाराम सातपुते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी व मराठा इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्विसेस चे संचालक प्रवीण जगताप यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे त्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवार १३ एप्रिल २०२५ रोजी बारामती येथे देण्यात आले.
या प्रसंगी याप्रसंगी उद्योग विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी,उपाध्यक्ष अभिजित आपटे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चैतन्य जोशी आणि बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार,उद्योजक राजेंद्र साळुंके, पुणे फॅशन मॉल चे संचालक रमेश शिर्के,ओमप्रकाश यादव आदी उपस्थित होते.
उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू असे निवडीनंतर सातपुते व जगताप यांनी सांगितले