
सातारा : धनंजय चोपडे यांचे स्वागत करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी आमदार दिपक चव्हाण व तुषार नाईक निंबाळकर
फलटण टुडे ( सातारा दि १७ एप्रिल २०२५):-कोरेगावचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग )पदाचा पदभार स्विकारला. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोशियनचे अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगाव चे माजी आमदार मा श्री दिपक चव्हाण यांनी आज त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
देऊरच्या मुधाईदेवी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून ते रुजू झाले.त्यानंतर प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी
जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून काम पाहिले. सोलापूर येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी सातारा व कोरेगाव येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला.
माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर यांची बदली झाल्याने रिक्त जागेवर धनंजय चोपडे यांची वर्णी लागली आहे.
शिक्षणाधिकारी पदी संधी मिळाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करताना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा सातारा जिल्ह्यातील सरकारी व खासगी शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच शिक्षकांचे प्रश्नही सोडविण्यास मदत होईल व चोपडे साहेबांच्या कार्यकाळात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा आशावाद याप्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार श्री दीपक चव्हाण,युवा उद्योजक श्री तुषार नाईक निंबाळकर व इतर पदाधिकारी , मान्यवर उपस्थित होते.
