युवा खेळाडूंसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर हे एक उत्तम व्यासपीठ – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण टुडे (फलटण दि १९ एप्रिल २०२५):-
खेळ आणि व्यायामाला या आजच्या युगात आपण महत्त्व दिले पाहिजे या विचाराने मुलांच्या बौधिक विकासबरोबर शारीरिक विकासाची जोड मिळाली पाहिजे या हेतूने फलटण एज्युकेशन सोसायटी च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.हे प्रशिक्षण ३ ठिकाणी आयोजित करण्यात आले असून श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई व एसएससी च्या क्रीडांगणावर ,मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर व माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे.

या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव घोरपडे होते

या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की युवा खेळाडूंसाठी खेळामध्ये करिअर करण्याचे एक उत्तम व्यासपीठ म्हणजे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर हे आहे .या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना अनेक उत्तम सवयी व खेळाची आवड निर्माण होऊन खेळांमध्ये सतत सरावाच्या माध्यमातून उत्तम करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून एक जीवनशैलीचा भाग व जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निवडलेला मार्ग साध्य करण्यासाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर हे एक उत्तम सुरुवातीचे व्यासपीठ आहे असे मत त्यांनी व्यक्त केले

यांनी फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव घोरपडे यांनी उपस्थित खेळाडूंना या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन समारंभाच्या प्रस्ताविकात क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ यांनी सांगितले की हे शिबिर सलग चौथ्या वर्षी घेत असून हेउन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 15 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये होत असून यामध्ये हॉकी, फुटबॉल खो-खो, स्केटिंग, आर्चरी अॅथलेटिक्स, कराटे या खेळाचा समावेश आहे .सदर उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन दररोज सकाळी 6.00 वा. ते 8.00 वा. या वेळेत होणार आहे. याशिवाय विशेष मार्गदर्शन विविध तज्ञ मार्गदर्शकांकडून होणार आहे. यामध्ये खेळाडूंचा आहार ,शारीरिक तंदुरुस्ती व दुखापतीचे पुनर्वसन, योगा यासह इतर अन्य महत्त्वाच्या विषयावरती शिबिरातील सर्व खेळाडूंना व्याख्यान पर मार्गदर्शन होणार आहे . अशी माहिती सांगितली.

शिबिरातील सहभागी सर्व विद्यार्थी यांना दररोज सकाळी मैदानावरील सराव झाल्यानंतर नाश्ता, केळी , सुगंधी दूध ,बिस्किट व उकडलेले कडधान्य असा पौष्टिक अल्पोहार दिला जाणार आहे. शिबिरातील सर्व प्रशिक्षण घेणारे खेळाडू यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .

या शिबिरामध्ये ॲथलेटिक्स साठी – श्री राज जाधव ,श्री जनार्दन पवार व श्री तायाप्पा शेडगे सर .आर्चरी ,कराटे या खेळासाठी- श्री सुरज ढेंबरे व कु. प्रिया शेडगे .फुटबॉल व स्केटिंग या खेळासाठी श्री अमित काळे, श्री मोनील शिंदे. खो-खो या खेळासाठी श्री कुमार पवार, श्री सुहास कदम, श्री अविनाश गंगतीरे, व सौ. मुलानी मॅडम, हॉकी या खेळासाठी-श्री खुरंगे बी.बी.श्री सचिन धुमाळ व कु.धनश्री क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत.

या उन्हाळी क्रीडा स्पर्धा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यमान प्राचार्य श्री. वसंत कृष्णा शेडगे, माजी प्राचार्य श्री. बाबासाहेब गंगावणे ,फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री. महादेव माने, श्री. संजय फडतरे, श्री स्वप्निल पाटील तसेच श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एस.एस.सी) च्या प्राचार्य सौ. अंजुम शेख व श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.सी ) च्या उपप्राचार्य सौ. स्नेहल भोसले तसेच फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. अभिजीत भोसले, श्री तुषार नाईक निंबाळकर, हे मान्यवर उपस्थित होते.

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा समितीचे सदस्य श्री तायप्पा शेंडगे यांनी केले .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!