
रुई येथील भैरवनाथ देवाची सुबक मूर्ती
फलटण टुडे (बारामती दि २० एप्रिल २०२५):-
रुई येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने भैरवनाथ यात्रा उत्सव होणार असून त्यासाठी भव्य कुस्ती स्पर्धा होणार असून विविध जिल्ह्यातील अनेक मल्ल सहभागी होणार असून अनेक बक्षिसे दिली जाणार आहेत .
रविवार दि २० एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता भैरवनाथ देवाचा हळदी कार्यक्रम,सोमवार दि.२१ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता काठी पालखी मिरवणूक दंडवत, नैवेद्य व घोटा कार्यक्रम सांयकाळी ७ वाजता लग्न सोहळा व रात्री ८ नंतर छबिना काठी पालखी भव्य मिरवणूक व शोभेचे दारूकाम रात्री ९ वा वसंत नांदवळकर सह रविंद्र पिंपळे लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम व व मंगळवार दि २२ रोजी सकाळी साडे अकरा ते साडेचार पर्यंत हजेरी कार्यक्रम ऑर्केस्ट्रा झपाटा व ४:३० नंतर भव्य कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.
१९१३ सालचे भैरवनाथ देवाचे मंदिर चे बांधकाम असून तेव्हापासून यात्रा उत्सव साजरे होतात,२००६ पासून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी झालेली असून मंदिर जीर्णोद्धार लवकरच होणार आहे ज्या भाविकांना देणगी द्यायची आहे त्यांना शासकीय नियमानुसार आयकर माप होणार असल्याचे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट रुई चे संस्थापक अध्यक्ष महादेवराव पांडुरंग चौधर व खजिनदार पोपट गणपत साळुंके यांनी सांगितले.