
भारत जाधव
फलटण टुडे (बारामती दि २५ एप्रिल २०२५):-
शिवसेना ( उबाठा गट) च्या भारतीय कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी पदी काटेवाडी येथील भारत जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत ,सेनेचे सरचिटणीस व उपनेते रघुनाथ कुचिक व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले.
बारामती एमआयडीसी येथील सुरेश ऑटो कंपनी मध्ये भारतीय कामगार सेनेची स्थापना करणे व तालुक्यात विविध कंपन्या मध्ये कामगार सेनेचे सभासद वाढविणे, उत्कृष्ट कामगार वेतन करार करणे ,सेनेच्या वतीने कामगारांच्या हितासाठी विविध आंदोलन,मोर्चा आदी च्या आयोजनात भारत जाधव यांचा योगदान म्हतपूर्ण असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स ,सुयश पतसंस्था आदी संस्थांवर जाधव कार्यरत आहेत.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे व सर्व राज्य पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कामगार सेना बळकट करण्यासाठी काम करू असे निवडीनंतर भारत जाधव यांनी सांगितले.
————/-