

फलटण टुडे (फलटण दि २५ एप्रिल २०२५):-
फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण आणि क्रिकेट अॅकॅडमी ऑफ चॅम्पियन्स, पुणे यांच्या सयूक्त विद्यमाने गोविंद चषक फलटण मधील पहिली लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
शुक्रवार दि.२ मे २०२५ ते बुधवार दि.१४ मे २०२५ पर्यंत स्पर्धा संपन्न होणार आहेत
या स्पर्धेमध्ये एकूण ८ निमंत्रित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत ते खालील प्रमाणे
१) सातारा जिल्हा क्रिकेट संघटना
२) स्पेशलाइज्ड क्रिकेट अकादमी पुणे
३) आर्यन क्रिकेट अकादमी पुणे
४) मिलिंद गुंजाळ स्पोर्ट्स अकादमी पुणे
५) सहारा क्रिकेट अकादमी बारामती
६) क्रिकेट अकादमी ऑफ चॅम्पियन्स फलटण चे तीन संघ सहभागी होणार आहेत.या संघांचा ड्रॉ काढून सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी सकाळी ८.०० वा.श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, फलटण येथे होणार आहे
या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे चेअरमन, मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगांव मतदार संघाचे माजी आमदार मा.श्री.दिपकराव चव्हाण , सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी मा. अॅड. कमलेश पिसाळ हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण आणि क्रिकेट ॲकॅडमी ऑफ चॅम्पियन्स, पुणे व फलटण चे प्रमुख
श्री.अशोक गाडगीळ असून त्यांनी फलटण येथील क्रिकेट प्रेमिनी होणाऱ्या या रंगतदार क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे.