
पै.अभिमन्यू चौधर
फलटण टुडे (बारामती दि ०४ मे २०२५):-
दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय ग्रीकरोमन (१७वर्षांखालील मुले) कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला नवा सन्मान मिळाला आहे. रुस्तम-ए-हिंद पै. अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या रुई येथील पै. अभिमन्यू पुष्पा संजय चौधर यांनी आपल्या दमदार कामगिरीने सुवर्णपदक पटकावले.
त्याच्या यशामुळे त्यांची “खेळो इंडिया युथ गेम्स २०२५” मधील महाराष्ट्र कुस्ती संघात निवड झाली आहे.
या स्पर्धेत निवड झालेला बारामती तालुक्यातील पहिला मल्ल म्हणून रुई मधील
अभिमन्यु सायन्स अॅकॅडमी
घाडगेवस्ती,बयाजी नगर,वंजारी वाडी ,जळोची, पेन्सिल चौक मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.