आय.एस.एम.टी युनियन च्या वतीने कामगार दिन साजरा

आय.एस.एम.टी युनियन च्या वतीने कामगार दिन साजरा करताना मान्यवर


फलटण टुडे (बारामती दि ०४ मे २०२५):-
बारामती एमआयडीसी येथील किर्लोस्कर फेअर्स कंपनी मधील मान्यताप्राप्त कामगार संघटना आय.एस.एम.टी कामगार युनियन च्या वतीने १मे कामगार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कामगार दीन उत्साहात साजरा. भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कामगार व त्यांच्या कुटूंबासाठी चांडाळ चौकडीच्या करामती फेम अभिनेते रामभाऊ जगताप यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला. विजेत्यां महिलांना
पैठणी , कुलर,म्युझिक सिस्टीम, मिक्सर, कुकर,अशी बक्षिसे देण्यात आली गायक समीर पठाण यांचा धमाल ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी कंपनीचे प्लांट हेड तनेश धिंग्रा,एच. आर. मॅनेजर अतुल कोठागळे,सर्व विभाग प्रमुख व
युनियन अध्यक्ष कल्याण कदम ,जनरल सेक्रेटरी – गुरुदेव सरोदे, उपाध्यक्ष- शिवाजी खामगळ, खजिनदार – नाना भगत,सल्लागार – हनुमंत बाबर,सुरेश दरेकर,सदस्य- प्रकाश बरडकर, आप्पा होळकर , संजय कचरे उपस्तीत होते.
कामगारांच्या व कुटूंबियांच्या कला गुणांना वाव मिळावा, मनोरंजन व्याहवे , गुणवंत पाल्यांचा सन्मान होणे साठी सदर कार्यक्रम युनियन च्या वतीने दरवर्षी घेतला जात असल्याचे अध्यक्ष कल्याण कदम व सरचिटणीस गुरुदेव सरोदे यांनी सांगितले.
वर्षातून एकदा कामगार व कुटूंब एकत्र आणून स्नेहसंमेलन होत असल्याबद्दल कामगारांनी व कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले.

———-……..

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!