
सपत्नीक नितीन जगताप यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी सत्कार करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण , माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे,रमणलाल दोशी,शिवाजीराव घोरपडे , अरविंद निकम ,प्राचार्य शेडगे सर व इतर मान्यवर
फलटण टुडे (फलटण दि १० मे २०२५) :
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण विद्यालयाचे उपप्राचार्य मा श्री नितीन जगताप
यांचा सेवा निवृत्ती समारंभ उत्सहात पार पडला.
जगताप सर १९९१ या साली फलटण एजुकेशन सोसायटी च्या मालोजीराजे शेती विद्यालय येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. १९९१ ते २०१० पर्यंत ते शेती शाळा येथे त्यांनी पवित्र अश्या ज्ञानदानाचे कार्य केले. सन २०१० ते २०१२ साली सरदार वल्लभभाई हायस्कूल साखरवाडी येथे उपशिक्षक म्हणून काम केली.२२ जून २०१२ पासून आज अखेर पर्यंत त्यांनी मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे ज्ञानदानाचे कार्य केले.
शांत, संयमी असे व्यक्तीमत्व असणारे जगताप सर यांनी विध्यार्थ्यांना शिस्त लावताना शांत व संयमी गुणांमुळे ते विध्यार्थी वर्गात सर्वांचे चाहते झाले.त्यांचा विज्ञान या विषयावर विशेष हातखंडा होता. त्यांच्या उपप्रचार्यपदाच्या काळात अनेक ठिकाणी सर्वोत्परी शाळेचे नाव लौकिक करून पारितोषिके मिळवून दिली. त्यामध्ये शाळेस आदर्श शाळा पुरस्कार ही मिळाला होता.जगताप सर यांनी फक्त शालेय विध्यार्थी न घडवता शहरातील विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत विविध स्पर्धेत शाळेचे नाव लौकिक केले.अशा या शांत व संयमी उपप्राचार्य नितीन जगताप सर यांचे शालेय सेवेतील ३३ वर्ष पूर्ण झाल्याने शाळेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन दि.२४ एप्रिल२०२५ रोजी ड्रॉइंग हॉल मध्ये करण्यात आले होते .
यावेळी उपप्राचार्य नितीन जगताप यांच्या पुढील सुखदाई जीवनासाठी शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण -कोरेगावचे माजी आमदार मा. दीपकराव चव्हाण ,महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी बोलतांना श्रीमंत रामराजे नाईक यांनी बोलताना सांगितले की जगताप सर व आमचे ऋणानुबंध हे फार जुने आहेत त्यांच्या वडिलांपासून ते अजूनही तितकेच घट्ट टिकून आहेत. ते जरी आज सेवानिवृत्त होत असले तरी आम्ही त्याना सेवानिवृत्त होऊ देणार नाही. त्यांच्या कामाचा हुरूप बघून त्यांच्या निवृत्तीच्या नवीन जिवनात येणाऱ्या काळात त्याना नक्कीच कामाची संधी मिळेल असे बोलताना त्यांनी सांगितले.
तसेच श्रीमंत संजीवराजे यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की जगताप सर हे फलटण एजुकेशन सोसायटीत आपल्या नियमित वयोमनानुसार तुम्ही जरी निवृत्त होत असला तरी एकदा एखादा व्यक्ती फलटण एज्युकेशन सोसायटीत आला की तो त्याच्याशी कायमचा जोडला जातो. इथून पुढच्या काळात तुम्ही हेच कार्य इतर मुलं मुलींसाठी तसेच समाजासाठी आपण चालू ठेवाल. तसेच प्रत्येक यशस्वी पूरषा मागे एक स्त्री असते तशी त्यांच्या पत्नीने देखील त्याना साथ दिली हे आम्ही पाहिलेले आहे अनुभवले आहे कारण महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी चांगले कार्य केले आहे. येणाऱ्या काळात त्याना निवृत्तीचे आयुष्य सुखाचे व आनंदाचे समाधानाचे जावो आशा शुभेच्छा दिल्या .
अध्यक्षीय भाषणात दीपराव चव्हाण म्हणाले की त्यांचे कार्य फार प्रेरणादाई आहे त्यांची कमतरता संस्थेला व इतर सहकार्याना भासेल तसेच त्यांनी शेक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या विषयी गौरवोद्गार काढले.
प्रस्तावित प्राचार्य श्री शेडगे सर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकमधे त्यांच्या सहकार्याची भूमिका व कामाप्रती असलेली निष्ठा यावेळी सांगितली. प्रशासनात कामाचा असलेला अनुभव यामुळे त्यांनी सकाळ विभाग उत्तमरित्या चालविला त्यामुळे मला तिकडे बघावे लागले नाही. त्यांनी उत्तम सहकार्याची भूमिका बजावली असे या वेळी बोलताना सांगितले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे , श्री रमणलाल दोशी , श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम,प्राचार्य शेडगे सर ,ज्युनियरचे उपप्राचार्य सोमनाथ माने,पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील , शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, राजकीय पुढारी,मित्र व माजी विध्यार्थी यांनी निरोप समारंभाला उपस्थित राहून उपप्राचार्य जगताप सर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.यामध्ये माजी प्राचार्य श्री अर्जुन रूपनवर,श्री शेखर जगताप, श्री संतोष तोडकर ,सौ लतिका अनपट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच ३३ वर्ष शाळेतील सेवेला दिल्यानंतर सेवा निवृत्त कार्यक्रमात उपस्थितांचे आभार व्यक्त करताना सत्कारमूर्ती उपप्राचार्य नितीन जगताप यांचे डोळे पाणावले होते तर हृदय कासावीस झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या कार्याचा आढावा मांडला की मी आपल्या संस्थेमध्ये 1991 मध्ये मालोजीराजे शेती विद्यालय येथे नोकरीची सुरुवात केली 1991 ते 2010 पर्यंत मी शेती शाळेतच होतो 2010 ते 2012 आपल्या संस्थेच्या सरदार वल्लभभाई हायस्कूल साखरवाडी येथे उपस्थित म्हणून काम पाहिले त्यानंतर 22 जून 2012 पासून आज पर्यंत मी मुधोजी हायस्कूल येथे काम केले यामध्ये आठ महिने पर्यवेक्षक व नऊ महिने उपमुख्याध्यापक म्हणून काम पाहिले माझे शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय व कृषी पदवीचे शिक्षण कोकण कृषी विद्यापीठात झाले मी शेती शाळेत शेती विषय व विज्ञान विषय शिकवत असे त्यानंतर काही कालावधीनंतर शेती विषय बंद झाल्याने मी विज्ञान विशेष शिकवू लागलो माझे वडील सुद्धा मालोजीराजे शेती विद्यालय येथे शिक्षक होते सेवा समाप्तीनंतर ते तिथेच सेवानिवृत्त झाले व त्यांच्या जागी कैलासवासी श्रीमंत शिवाजी राजे महाराज साहेब यांनी मला 1991 पासून संस्थेत काम करण्याची संधी दिली. सुरुवातीपासूनच मी माननीय श्रीमंत रामराजे साहेब श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबर राजकीय अनुभव घेत त्यांच्या छत्रछायेखाली राजकारणाचे धडे घेऊन लोक समाजकार्यात भाग घेण्याचा प्रयत्न करत होतो या कामी तिन्ही बंधूंनी मला नेहमीच साथ दिली राजे गटाचं कार्य करत असताना मला तिन्ही बंधूंनी नेहमीच सक्रिय साथ दिली माझ्या राजकीय कामासोबत माझ्या पत्नीने बचत गटामार्फत केलेल्या कार्याचा राजे गटासाठी नेहमीच फायदा झाला व याची नोंद तिन्ही बंधूंनी घेऊन माझ्या पत्नीला बचत फेडरेशन वर व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वर नियुक्ती करून प्रतिष्ठा मिळवून दिली अशा रीतीने आम्ही दोघा पती-पत्नीने राजे गटाचे कार्य चालू ठेवले आणि ते आज अखेर पर्यत चालू आहे व इथून पुढे ही चालू राहील असे सांगितले.
यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी श्री बंडू खुरंगे यांनी आभार मानले.
