
प्रवीण शर्मा व्ही आर बॉयलर चे चेअरमन राजाराम सातपुते यांचा सन्मान करताना
फलटण टुडे (बारामती दि १० मे २०२५):-
बारामती एमआयडीसी येथील व्ही. आर .बॉयलर सोलूंशन प्रा. ली यांचा वैद्यनाथ आयुर्वेद प्रा. ली. शिवणी मध्यप्रदेश भोपाळ आयुर्वेद क्षेत्रातील कंपनीने उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे.
या प्रसंगी बैद्यनाथ कंपनीचे संचालक प्रवीण शर्मा,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक झा,वरिष्ठ अधिकारी धीरेंद्र गुप्ता यांनी व्ही आर बॉयलर चे चेअरमन राजाराम सातपुते यांचा सन्मान करून प्रशस्तीपत्र दिले.
चार टी. पी. एच. बॉयलर ची कमी वेळेत उभारणी आणि चालू करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आणि सिद्धायु आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड (वडसा) गडचिरोली वैद्यनाथ बायो फ्युल बुटीबोरी एमआयडीसी नागपूर या ५५ टी. पी. एच. चे बॉयलर चे अनुभवी व तज्ञ टीम च्या माध्यमातून जलद गतीने पूर्ण केले व कंपनीचे नुकसान टाळले या बदल सदर सन्मान करण्यात आल्याचे संचालक प्रवीण शर्मा यांनी सांगितले.
———-……