मेडिटेरियन आहार – आरोग्य, स्वाद आणि संतुलित जीवनशैलीचा मार्ग.आहार तज्ञ – सेजल छगन आटोळे

सेजल आटोळे

फलटण टुडे (बारामती दि १० मे २०२५)
आजच्या धावपळीच्या मानसिक तणावाने भरलेल्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही सामान्य बाब झाली आहे. चुकीच्या आहार सवयी, फास्ट फूडचा अतिरेक आणि व्यायामाच्या अभाव यामुळे मधुमेह हृदयरोग लठ्ठपणा यासारखे आजार वाढत आहेत. आहार निवडताना त्याचे पोषणमूल्य आणि दीर्घकालीन फायदे विचारात घेणे आवश्यक आहे.
असे प्रतिपादन प्रसिद्ध आहार तज्ञ सेजल छगन आटोळे यांनी केले.
बारामती येथे आयोजित संतुलित आहार या विषयावरील परिसंवाद मध्ये त्या बोलत होत्या .
या प्रसंगी अनेक वैदकीय क्षेत्रातील नामांकित आहार तज्ञ,शिक्षक,विद्यार्थी आदी उपस्तीत होते.
नैसर्गिक संतुलित व विज्ञानाधारित आहार शैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे याच अनुषंगाने सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली आणि संशोधनाद्वारे सिद्ध झालेली आहार पद्धती म्हणजे “मेडिटेरियन आहार” हृदयासाठी हितकारक,मधुमेहावर नियंत्रण आणि मानसिक स्वास्थ्यासाठी प्रभावी आहार पद्धत.
मेडिटेरियन आहार म्हणजे नेमकं काय?
हा आहार भूमध्यसागरी किनाऱ्यालगत असलेल्या देशातील (ग्रीस,इटली,स्पेन) पारंपारिक अन्नपद्धतीवर आधारित आहे ही पद्धत स्थानिक ताजा व कमी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवर वर आधारित आहे यामध्ये मुख्यतः
-ताज्या भाज्या व फळे
-संपूर्ण धान्य (गहू ओट्स ब्राऊन राईस)
-कडधान्य शेंगदाणे बिया
-ऑलिव्ह तेल (मुख्य खाद्यतेल )
-मासे अंडी पनीर – मध्यम प्रमाणात -लाल मांस व साखरेचा – अतिशय कमी वापर
आरोग्य विषयक फायदे

  1. हृदयरोगाचा धोका कमी होतो- मेडिटेरियन आहारात मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स जास्तीत असतात,(मुख्यतः ऑलिव्ह तेलामुळे) जे हृदयासाठी चांगले असतात विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे की हा आहार उच्च रक्तदाब खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो.
  2. मधुमेहावर नियंत्रण – फायबर युक्त अन्न आणि कमी साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये मेडिटेरियन आहार केल्यास इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.
  3. वजन नियंत्रण व लठ्ठपणावर नियंत्रण – या आहारात असलेले नैसर्गिक अन्नपदार्थ पचनास मदत करतात कमी प्रक्रिया केलेले अन्न अधिक वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतात ज्यामुळे अति खाणं टाळता येतो.
  4. मेंदू आणि मानसिक आरोग्य- डिप्रेशन सारख्या मानसिक समस्या कमी होण्यास मदत होते असं संशोधनातून दिसून आला आहे ओमेगा ३फॅटी ऍसिड व अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देतात.
    भारतीय जीवनशैलीत समावेश कसा कराल?
    भारतीय स्वयंपाकात काही बदल करून मेडिटेरेनियन आहार सहज अवलंबता येतो:
    ऑलिव्ह तेलाचा वापर स्वयंपाकात करा (मध्यम आचेवर)-तुपाऐवजी ऑलिव्ह तेलाचा वापर करा (शक्य तेव्हा).
    जास्तीत जास्त भाज्या आणि फळांचा समावेश जेवणात ठेवा.
    संपूर्ण धान्ये निवडा – पॉलिश न केलेला तांदूळ, ओट्स, गव्हाची चपाती.
    प्रोसेस्ड फूड, बिस्किटे, बेकरी पदार्थ टाळा.
    आठवड्यातून २ वेळा मासे किंवा प्रथिनयुक्त कडधान्य वापरा.
    दूध, ताक, दही – नैसर्गिक स्वरूपात आणि माफक प्रमाणात घ्या.

मेडिटेरेनियन आहार केवळ “डाएट” नव्हे, तर ही एक सकारात्मक जीवनशैली आहे. फॅड डाएट्सच्या जाळ्यात न अडकता, आपण पारंपरिक, पोषक आणि चवदार आहाराकडे वळायला हवे. आपल्याला दीर्घायुष्य, चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता हवी असेल, तर मेडिटेरेनियन आहार हे एक उत्तम पाऊल ठरू शकते असेही सेजल आटोळे यांनी सांगितले.
आभार डॉ मनोज शिंदे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!