आरोग्य तपासणी जीवनातील म्हतपूर्ण भाग : स्वाती ढवाण

पिंपळी मध्ये आरोग्य तपासणी शिबीर च्या उदघाटन प्रसंगी स्वाती ढवाण व इतर

फलटण टुडे (बारामती दि १० मे २०२५):-
आत्याधुनिक युगात मानवी जीवन ताण तणाव युक्त झालेले आहे म्हणून विविध आजार कमी वयात होतात त्यामुळे आरोग्य तपासणी ही महत्त्वपूर्ण भाग प्रत्येकाच्या जीवनात असल्याचे प्रतिपादन पिंपळी लिंमटेकच्या सरपंच स्वाती ढवण यांनी केले.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग ग्रामपंचायत पिंपळी आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे मंगळवार दि.२९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्करोग निदान चाचणी, रक्तदाब तपासणी, रक्त परीक्षण ,शुगर टेस्ट, हेल्थ चेकअप, इलेक्ट्रिक कार्डिओग्राफि ईसीजी, गर्भाशय आणि स्त्रीरोग तपासणी , नेत्र तपासणी करणेत आली.
शिबिराचे उद्घाटन प्रसंगी पिंपळी लिमटेक ग्रामपंचायत च्या सरपंच स्वाती अशोकराव ढवाण यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी यावेळी ग्रामपंचायतीचे अजित थोरात, मंगल केसकर , अश्विनी बनसोडे,मंगल खिलारे, वैभव पवार,व छत्रपती कारखान्याचे मा. संचालक संतोष ढवाण व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढवाण, सुनील बनसोडे ,बलभीम यादव , डॉ दिपाली शिंदे , बाळासाहेब देवकाते व ग्रामसेवक बाळासाहेब भोईटे आणि कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय चे डॉ. प्रा .लोंढे ,प्रा. सोनवणे, प्रा.डीसले,प्रा. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांचे आरोग्य साठी तपासणी घेऊन जर आजार असेल तर लवकर निदान व्याहवे व आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकाने दक्ष रहावे म्हणून मोफत तपासणी शिबीर घेतले असल्याचे सरपंच स्वाती ढवाण यांनी सांगितले.
आभार फोरम चे सचिन पवार यांनी मानले


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!