विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

इ. १२वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखांचा घवघवीत निकाल

कला, विज्ञान वाणिज्य शाखेतील उच्चंकी गुण मिळवणारे विद्यार्थी

फलटण टुडे (बारामती दि १६ मे २०२५):-
येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी परीक्षेचा निकाल विज्ञान शाखेत ९९.६२%, वाणिज्य शाखेत ९७.७२% तर कला शाखेत ८५.७९% लागला आहे.
विज्ञान शाखेतील यशस्वी विद्यार्थी :
पवार संजना सुधाकर हिने ९०.६७% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. मोकाशी ओम परमेश्वर याने ८९.५०% गुणांसह द्वितीय तर काळे वैष्णवी अनिल व शिर्के सुयोग सहदेव यांनी ८७.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. विशेष उल्लेखनीय म्हणजे यादव गायत्री सर्जेराव व थोरात प्रेम नंदकुमार यांनी आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून पुणे बोर्डात प्रथम क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेतील यशस्वी विद्यार्थी :
मानेदेशमुख शतावरी सुदर्शन हिने ९४.५०% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. मोरे साक्षी बाळासो हिने ९३.८३% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर शाहीर नेहा हेमंत व मलगुंडे स्नेहा बाळासो यांनी ९०.३३% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. शहागडकर नंदिनी शंकर हिने बुक किपिंग आणि अकाउंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून पुणे बोर्डात प्रथम क्रमांक मिळवला.
कला शाखेतील यशस्वी विद्यार्थी :
दळवी आदिती गणेश हिने ९३.६७% गुणांसह प्रथम, सोनवणे समृद्धी कुंडलिक हिने ८९.६७% गुणांसह द्वितीय, तर खरात प्राजक्ता शरद हिने ८७.८३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार , उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, उपाध्यक्ष अँड. अशोक प्रभुणे, सचिव अँड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, सौ. सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर, कर्नल श्रीष कंबोज, प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. अंकुश खोत तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!