
जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेची बैठक होत असताना पदाधिकारी व माजी सैनिक
फलटण टुडे (बारामती दि १७ मे २०२५):-
सध्या जरी शस्त्र संधी झाली असली तरी येणाऱ्या काळात पाकिस्तान वर अजिबात विश्वास नसल्याने कधीही युद्ध होऊ शकते अशा वेळी माझी सैनिक म्हणून बारामती तालुक्यातील अनेक सैनिक गरजेनुसार सरकारच्या मागणी नुसार सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहेत असे प्रतिपादन बारामती तालुका जय जवान आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी प्रतिपादन केले
रविवार दि.११ मे २०२५ रोजी जय जवान आजी माजी सैनिक संघटनेची बैठक होऊन आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन सीमेवर लढण्यासाठी जाण्याचे एकमताने ठराव पास केला
या वेळी बारामती तालुक्यातील सर्व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
भारत – पाक युद्ध संदर्भात चर्चा झाली जरी शस्त्र संधी झाली असली तरी तरी पाकीस्तान चा भरोसा नाही आपण तयार राहु वेळ प्रसंगी जम्मू- काश्मिर मध्ये मोठ्या संख्येने जावून भारतीय सैनिकांना दुसऱ्या फळीत सर्व प्रकारची मदत करू यावर सर्वांचे एकमत झाले
शासनाकडे सीमेवर जाण्यासाठी इच्छुकांची यादी देण्यात आलेली आहे
व या वयात सुद्धा माजी सैनिक संसार,मुले, नातवंड व व्यवसाय नोकरी आदी चा त्याग करून सीमेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत हेच खरे भारत माते बदल देशप्रेम असल्याचे हनुमंत निंबाळकर यांनी सांगितले
भारत माता की जय, जय जवान जय किसान च्या घोषणा देत बैठकीची सांगता करण्यात आली