
ऑल इंडिया लीनेस क्लब च्या वतीने रुई येथे कार्यक्रम करताना
फलटण टुडे (बारामती दि १७ मे २०२५):-
बारामती येथील ऑल इंडिया लीनेस क्लब च्या
‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ‘ या अंतर्गत रुई ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना पौष्टीक आरोग्य वर्धक नाष्टा व रुग्णालयात लागणारे अत्यावश्यक साहित्य चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी लीनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे ,सचिव मनीषा खेडेकर सदर उपक्रम प्रमुख सुनंदा जगताप, राणी जगताप, लता भोसले व सदस्यां सुचिता ढवाण, सपना चांदगुडे, उल्काताई जाचक, विजया कदम आणि आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, सोमेश्वर कारखान्याच्या मा. उपाध्यक्षा प्रणिता खोमणे व रुई ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यास्मिन पटेल व इतर मान्यवर उपस्तीत होते.
लिनेन्स क्लबच्या वतीने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून,रुग्णांना व नातेवाईक यांना मदत करणे व डॉक्टर व नर्स यांच्या साह्याने आजार होऊ नये म्हणून जनजागृती करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य असल्याचे लीनेस क्लब च्या वतीने सुनंदा जगताप यांनी सांगितले.
आभार विजया कदम यांनी मानले