झैनबिया स्कूल सीबीएसई दहावी बोर्डच्या विद्यार्थ्यांचे यश

जेनिबिया स्कूलचे इयत्ता दहावी मधील यशस्वी विद्यार्थी


फलटण टुडे (बारामती दि १७ मे २०२५):-
झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळचा या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचा सीबीएसई बोर्डचा उत्कृष्ट उच्चांकी १००% निकाल लागला असून झैनबिया स्कूल ही दरवर्षी
या परीक्षेत कु.अनुष्का कालगावकर हिने ९८% मिळवून प्रथम क्रमांक मिळला आहे. कु.आदित्य खत्री याने ९७.४% मिळून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच कु. इकरा शेख ९७.२% मिळून तृतीय क्रमांक मिळविला आहे. कु.अमूल्या वासवडे ९७% व कु.आर्या रेडकर 97% हिने चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. कु.सारा शेख ९६.४%व कु.तनिष्का गावडे ९६% हिने पाचवा क्रमांक मिळविला आहे. कु.नम्रता नेवसे ९५.२% व कु.आरोही गावडे यांनी ९५%सहावा क्रमांक मिळवला आहे. टक्केवारी मिळवलेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.
९०% ते १००% मिळालेले १७ विद्यार्थी आहेत.
80% ते 90% मिळालेले 13 विद्यार्थी आहेत.
या यशाबद्दल अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट बारामती व स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका इन्सिया नाशिकवाला यांनी शिक्षकवर्ग, शिक्षक इतर कर्मचारी, यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!