दि. 17 मे रोजी पोंभुर्लेत बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

फलटण टुडे ( फलटण दि १६ मे २०२५):-

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 179 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने शनिवार, दि.17 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वा. पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील संस्थेच्या ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा अभिवादन कार्यक्रम तळेरे येथील ज्येष्ठ पत्रकार तथा तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दूदवडकर यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली, पोंभुर्लेच्या सरपंच सौ. प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, गुरुकुल करिअर अ‍ॅकॅडमीचे प्रमुख बाजीराव जांभेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

या अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, जांभेकर कुटूंबिय व पोंभुर्ले, जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!