
फलटण टुडे (फलटण दि १७ मे २०२५):–
संगिनी फोरम फलटणच्या माजी अध्यक्षां सौ अपर्णा जैन यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२५ ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
फलटण येथील संत ऊपळेकर महाराज मंदिर हाॅल येथे संपन्न झालेल्या शानदार समारंभात पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समीती व सुजन फाउंडेशन यांच्या वतीने संगिनी फोरम मार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ.अपर्णा श्रीपाल जैन यांना सौ.अलकाताई बेडकीहाळ यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ सर होते. यावेळी महात्मा फुले विचार अभियान महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संपतराव जाधव, साहित्यिक सर्जाकार सुरेश शिंदे सुजन फाउंडेशन चे अध्यक्ष अजितराव जाधव उपस्थित होते.
सौ.अपर्णा जैन यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची सुजन फाउंडेशन ने दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2025 देऊन गौरव केला.
सौ.अपर्णा जैन यानां पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

