
श्री महाकाळेश्वर युथ फौंडेशन चे पदाधिकारी व मान्यवर
फलटण टुडे (बारामती दि १८ मे २०२५):-
श्री महाकालेश्वर फाउंडेशन आयोजित धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची
जयंती ( बुधवार १४ मे ) उत्साहात विविध संपन्न झाली.
सुर्यनगरी येथे जयंतीनिमित्त मर्दानी खेळ, शिवकालीन वेशभूषा,व्याख्यान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संभाजी महाराजांचे शौर्य,धर्मिष्ठा व स्वराज्य प्रेम जगात कोणाकडे सुद्धा नाही हे त्यांच्या त्याग व बलिदान मधून दिसून येत असल्याचे व्याख्याते प्रा. मनोज पाटील यांनी सांगितले.
बारामती एमआयडीसी चे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत पाटील, अजितदादा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, अभिनेत्री श्रद्धा शिंदे,गणेश बोरावके, अमोल तोरणे, निलेश खराडे, ऋषिकेश फाळके ,धनंजय जमदाडे, गणेश पवार ,अभिराज टेकवडे ,चेतन घाडगे ,सुजित चव्हाण ,ओंकार पवार, गणेश चव्हाण ,दीपक गायकवाड, विशाल चव्हाण ,नितीन खोत ,सागर टिंगरे, शुभम जाधव, प्रेम लोखंडे,य अक्षय, प्रदीप गायकवाड ,अक्षय माने,हर्षल तोरणे, अभि जाधव, आविष्कार ढवळे ,कार्तिक मांढरे,
आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र कळावे व त्याग,बलिदान यांचे स्मरण युवा व नवीन पिढीला व्हावे त्यांचा आदर्श घ्यावा म्हणून सदर कार्यक्रम घेत असल्याचे श्री महाकाळेश्वर युथ फौंडेशन च्या वतीने सांगण्यात आले.
मर्दानी खेळ सादरीकरण व इतिहास कालीन वेशभूषा मधील सहभागी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

