लग्नाचा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम

मेडद येथील कार्यक्रमात शाळेला मदत करताना मान्यवर

फलटण टुडे (बारामती २३ मे २०२५):-
खरं पाहायला गेलं, तर विवाह सोहळा हा एक संस्कार; पण याच विवाह सोहळ्याला आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याचा मंच काहीजण समजत आहेत. थाटामाटात लग्न करून समाजात मोठेपणा मिरवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही मात्र..
बारामती तालुक्यातील मेडद येथील दादासाहेब बबनराव कांबळे (कोळी) माजी सैनिक (सीमा सुरक्षा बल) यांची मुलगी प्रहरी हिच्या विवाहाच्या आधी एक दिवस होणाऱ्या गाव देवदर्शन (पाया पडणे सोहळा) थाटामाटा डीजे लावून न करत तो साधेपणाने काढून जो होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या खर्चातून सामाजिक जाणीवेतून दादासाहेब कांबळे (कोळी) मेडद परिवारातर्फे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मेडद मधील तीन वर्गामध्ये तीन पंखे बसविण्यात आले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडद मधील तीन वर्गामध्ये तीन पंखे बसविण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्यापासून त्रास हा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. या उपक्रमामुळे त्यांनी समाजासमोर विशेषता तरुण मंडळी पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. हा उपक्रम राबविताना प्रमुख पाहुणे म्हणून अँड.विजय बर्गे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बारामती, हरिभाऊ हिंगसे कुष्ठरोग तज्ञ प्रा डॉ. ज्ञानदेव सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम समारोह आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संतोष यादव मा. ग्रामपंचायत सदस्य मेडद, पत्रकार माधव झगडे , कृष्णा शिंदे , डॉ. मकरंद कांबळे, माधव गावडे अध्यक्ष भैरवनाथ विद्यालय मेडद,मुख्याध्यापक नाकोरे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मेडद, मुख्याध्यापक गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडद, स्नेहांकित कांबळे , सुजल कांबळे , कुणाल कांबळे, राज नेवसे, यश नेवसे, आदित्य नेवसे, ओम नेवसे, मालन दादासाहेब कांबळे ग्रामपंचायत सदस्य मेडद, सोनाली नेवसे ग्रामपंचायत सदस्य मेडद, दिपाली कांबळे , प्रहरी कांबळे सार्थक कांबळे , अनन्या कांबळे आदी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!